सूरह Al-Maa'un — Almsgiving

सूरह Al-Maa'un (Almsgiving) — 107/114 · 7 आयते. अरबी मजकूर आणि मराठी अनुवादासह वाचा आणि ऐका.

أَرَءَيۡتَ ٱلَّذِي يُكَذِّبُ بِٱلدِّينِ

१. काय तुम्ही (त्यालाही) पाहिले जो मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरवितो

Ayah 1

فَذَٰلِكَ ٱلَّذِي يَدُعُّ ٱلۡيَتِيمَ

२. हाच तो होय, जो अनाथाला धक्के मारतो

Ayah 2

وَلَا يَحُضُّ عَلَىٰ طَعَامِ ٱلۡمِسۡكِينِ

३. आणि गरीबाला जेवु घालण्यास प्रोत्साहन देत नाही

Ayah 3

فَوَيۡلࣱ لِّلۡمُصَلِّينَ

४. त्या नमाजी लोकांकरिता ‘वैल’ (नामक जहन्नमची एक जागा) आहे

Ayah 4

ٱلَّذِينَ هُمۡ عَن صَلَاتِهِمۡ سَاهُونَ

५. जे आपल्या नमाजांपासून गाफील आहेत

Ayah 5

ٱلَّذِينَ هُمۡ يُرَآءُونَ

६. जे केवळ देखावा दाखवितात

Ayah 6

وَيَمۡنَعُونَ ٱلۡمَاعُونَ

७. आणि वापरण्याची वस्तू रोखून धरतात

Ayah 7