सूरह Al-Humaza — The Traducer

सूरह Al-Humaza (The Traducer) — 104/114 · 9 आयते. अरबी मजकूर आणि मराठी अनुवादासह वाचा आणि ऐका.

وَيۡلࣱ لِّكُلِّ هُمَزَةࣲ لُّمَزَةٍ

१. मोठी वाईट अवस्था आहे अशा त्या प्रत्येक माणसाची जो व्यंग दोष शोधणारा, चहाडी करणारा असेल

Ayah 1

ٱلَّذِي جَمَعَ مَالࣰ ا وَعَدَّدَهُۥ

२. जो धन - दौलत एकत्र करतो आणि मोजून ठेवतो

Ayah 2

يَحۡسَبُ أَنَّ مَالَهُۥٓ أَخۡلَدَهُۥ

३. तो असे समजतो की त्याची धन - दौलत त्यांच्याजवळ सदा सर्वकाळ राहील

Ayah 3

كَلَّاۖ لَيُنۢبَذَنَّ فِي ٱلۡحُطَمَةِ

४. मुळीच नाही. हा तर चुराडा करून टाकणाऱ्या आगीत फेकला जाईल

Ayah 4

وَمَآ أَدۡرَىٰكَ مَا ٱلۡحُطَمَةُ

५. आणि तुम्हाला काय माहीत की अशी आग काय असेल

Ayah 5

نَارُ ٱللَّهِ ٱلۡمُوقَدَةُ

६. ती अल्लाहने पेटविलेली आग असेल

Ayah 6

ٱلَّتِي تَطَّلِعُ عَلَى ٱلۡأَفۡـِٔدَةِ

७. जी हृदयांवर चढतच जाईल

Ayah 7

إِنَّهَا عَلَيۡهِم مُّؤۡصَدَةࣱ‏

८. (ती आग) सगळीकडून बंदिस्त असेल

Ayah 8

فِي عَمَدࣲ مُّمَدَّدَةِۭ

९. आणि त्यांच्यावर मोठमोठ्या खांबांमध्ये

Ayah 9