सूरह Az-Zalzala — The Earthquake

सूरह Az-Zalzala (The Earthquake) — 99/114 · 8 आयते. अरबी मजकूर आणि मराठी अनुवादासह वाचा आणि ऐका.

إِذَا زُلۡزِلَتِ ٱلۡأَرۡضُ زِلۡزَالَهَا

१. जेव्हा जमिनीला पूर्णपणे थरथर हलविले जाईल

Ayah 1

وَأَخۡرَجَتِ ٱلۡأَرۡضُ أَثۡقَالَهَا

२. आणि ती आपल्यात असलेले सर्व ओझे बाहेर काढून फेकेल

Ayah 2

وَقَالَ ٱلۡإِنسَٰنُ مَا لَهَا

३. मनुष्य म्हणू लागेल की हिला झाले तरी काय

Ayah 3

يَوۡمَئِذࣲ تُحَدِّثُ أَخۡبَارَهَا

४. त्या दिवशी जमीन आपला सर्व अहवाल सादर करील

Ayah 4

بِأَنَّ رَبَّكَ أَوۡحَىٰ لَهَا

५. यासाठी की तुमच्या पालनकर्त्याने तिला तसा आदेश दिला असेल

Ayah 5

يَوۡمَئِذࣲ يَصۡدُرُ ٱلنَّاسُ أَشۡتَاتࣰ ا لِّيُرَوۡاْ أَعۡمَٰلَهُمۡ

६. त्या दिवशी लोक वेगवेगळ्या जमाती बनून (परत) फिरतील यासाठी की त्यांना त्यांची कर्मे दाखविली जावीत

Ayah 6

فَمَن يَعۡمَلۡ مِثۡقَالَ ذَرَّةٍ خَيۡرࣰ ا يَرَهُۥ

७. तेव्हा, ज्याने कणाइतकेही सत्कर्म केले असेल, तो ते पाहील

Ayah 7

وَمَن يَعۡمَلۡ مِثۡقَالَ ذَرَّةࣲ شَرࣰّ ا يَرَهُۥ

८. आणि ज्याने कणाइतकेही दुष्कर्म केले असेल, तो ते पाहील

Ayah 8